NEWS

Principal Message

Dr.R.L.Ambekar
Principal
RAA,Amravati

“शिक्षणाचा  अधिकार अधिनियम 2009 नुसार वय वर्ष 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलं शाळेत प्रवेशीत झाले पाहिजे. त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे व ते प्रगत झाले पाहिजे. या करिता राज्यस्तरावर विद्या प्राधिकरण,पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण व जिल्हास्तरावर जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था प्रभावीपणे शाळांना व शिक्षकांना शैक्षणिक सहाय्य करीत आहे.

        प्रस्तुत संस्था ही शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक 17 ऑक्टोबर 2016 नुसार प्रादेशिक विद्या प्राधिकरण या  नावाने कार्यरत आहे. अमरावती विभाग SLAS,ASER  व NAS  चे संपादणूक सर्वेक्षणामध्ये पिछाडीवर असल्याचे दिसून येते. याचे प्रमुख कारण म्हणजे 100 % विद्यार्थ्यांनी 100% मूलभूत क्षमता प्राप्त न करणे. तसेच शिक्षकांनी अध्ययन निष्पत्तीनुसार अध्ययन अध्यापनाची दिशा निश्चित न करणे. या करिता संकेत स्थळाच्या माध्यमातून विभागातील पाचही जिल्ह्यांमधील 100% विद्यार्थ्यांनी 100 % मूलभूत क्षमता प्राप्त करणे व अध्ययन निष्पत्तीनुसार अध्यापनाची दिशा ठरविणे याकरिता संकेतस्थळाच्या माध्यमातून संस्था सातत्याने शाळांना व शिक्षकांना शैक्षणिक सहाय्य करेल अशी मला खात्री आहे.
           राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणामध्ये विद्यार्थ्यांची संपादणूक वाढावी हेच अंतिम उद्दिष्ट नसून 21 व्या शतकातील आवश्यक ती कौशल्ये उदा.सृजनशील विचार, चिकित्सक विचार,सांघिक विचाराचे कौशल्य तसेच प्रश्न सोडविण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे. त्यामधुनच सुजान व सक्षम नागरिक तयार होईल. त्याकरिता संस्था सातत्याने वाटचाल करित आहे.
            या संकेतस्थळाचा उपयोग विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना निश्चितच होईल अशी अपेक्षा करतो.”
धन्यवाद !!!
                                                                                                                प्राचार्य
                                                                                          प्रादेशिक विद्या प्राधिकरण,अमरावती

© 2019 Regional Academic Authority, Amravati      Designed by: PrimaThink Technology